उल्हासनगरातील प्रेरणा ठरली शंभर नंबरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

उल्हासनगर - दहावीच्या यंदाच्या निकालात 193 मुलांनी शंभर पैकी शंभर गुण मिळविले आहेत. त्यामध्ये उल्हासनगरमधील प्रेरणा प्रविण ढुमरे हीचाही समावेश असून तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

उल्हासनगर - दहावीच्या यंदाच्या निकालात 193 मुलांनी शंभर पैकी शंभर गुण मिळविले आहेत. त्यामध्ये उल्हासनगरमधील प्रेरणा प्रविण ढुमरे हीचाही समावेश असून तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

"होली फॅमिली' या शाळेची विद्यार्थीनी असलेल्या प्रेरणाची वडील प्रविण ढुमरे हे विविध रुग्णालयात मधुमेहाच्या मशीनद्वारे रुग्णांच्या मधुमेहाची तपासणी करतात. ते वयोवृद्ध रुग्णांच्या घरी देखील जातात. प्रेरणाची आई पद्मा या गृहिणी आहेत. विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पुढे डॉक्‍टर होण्याचा मनोदय प्रेरणाने व्यक्त केली आहे. शिवसेना गटनेते रमेश चव्हाण, नगरसेवक सुमित सोनकांबळे, नगरसेविका ज्योती माने, ज्योत्स्ना जाधव, मनसे शहर अध्यक्ष प्रदिप गोडसे, मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू देशमुख, शहर अध्यक्ष मनोज शेलार यांच्या सह विविध राजकीय नेते,आदींनी प्रेरणाचे कौतुक केले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -

काँग्रेस आमदार सत्तार यांच्याकडून शेतकऱ्याला मारहाण
मुंबई: मेट्रोसाठी 'आरे'मधील जागा हस्तांतरीत करण्याचा मार्ग मोकळा
करमाळा- 'आदिनाथ'च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे संतोष जाधव-पाटील
कर्जमाफी : चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार
पुणे: चार धरणांत साडेअकरा टक्के पाणीसाठा शिल्लक

बारामतीत पावसाच्या जोरदार सरी
VIDEO: लंडनमध्ये 27 मजली इमारतीला भीषण आग
डास, चिलटांमुळे भूकंप होत नाही - भाजपकडून प्रतिहल्ला
#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'​
दोन मिनिटांनी मोठी निष्ठा टक्‍क्‍यांनीही पुढेच​
अमित शहांच्या दौऱ्यात शक्तीप्रदर्शनासाठी हजार रूपये
सरकार धमक्‍यांना घाबरत नाही - चंद्रकांत पाटील​