शिवसेनेला दगा देणारा राजकारणातून संपला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

उल्हासनगर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणाच्या सर्वोच्च शिखराचा मान दिल्यावरही ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला दगा दिला, तो राजकारणातूनच संपला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री आणि संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी येथे केले. शिवसेना निष्ठावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असून शाखाप्रमुख ते मंत्री हा पुरावा तुमच्यासमक्ष उभा असल्याचेही त्यांनी सांगितले.

येथे झालेल्या कार्यकर्ता, गटप्रमुख मेळाव्यात शिंदे बोलत होते. शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या पुढाकाराने शहीद जनरल अरुणकुमार वैद्य टाऊन हॉलमध्ये मेळावा झाला. कोणत्याही निवडणुकीत गटप्रमुख हा उमेदवार आणि मतदार यांच्यातील प्रमुख दुवा असतो. मतदान यादीचा खरा अभ्यासक असतो. येणाऱ्या सर्व निवडणुकीत सर्व गटप्रमुखांकडून जागृकतेची अपेक्षा असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. या वेळी रुग्णमित्र भरत खरे, सामाजिक कार्यकर्ते राजेश फक्के, रिपाइंच्या विभागप्रमुखांनी शिवसेनेत प्रवेश केला. कुलदीपसिंह माथारू शीख बांधवांनी एकनाथ शिंदे यांचे तलवार देऊन स्वागत केले. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरला दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण शिंदे यांच्या हस्ते झाले. कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपनेते अल्ताफ शेख, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, महिला आघाडी संघटक मनीषा भानुशाली, रोजगार-स्वयंरोजगार सेनेचे कल्याण लोकसभा अध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपशहरप्रमुख राजेंद्र साहू, अरुण आशान, दिलीप गायकवाड, साऊथ इंडियन सेलचे तिरुपती रेड्डी, सिंधी सेनेचे सुनील दुसेजा, युवा सेना उपजिल्हा अधिकारी सोनू चानपूर, युवा सेना अधिकारी बाळा श्रीखंडे, सुमित सोनकांबळे आदी या वेळी उपस्थित होते.