मुंबईच्या रणांगणात मामा-भाच्याची लढाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपले पिताश्री मुलायम यांच्याविरुद्ध बंडखोरी केल्याने बाप-लेकांमधील हा वाद गाजत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यामधील वाद पेशवाईपासूनच सुरू आहे. आताही पुतणे काकांना आव्हान देत आहेत; मात्र मुंबई महापालिकेच्या मैदानात मामा आणि भाचा प्रथमच एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. मामा-भाच्याची ही लढाई मुलुंडमध्ये होत आहे. 

शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले प्रभाकर शिंदे यांना त्यांच्यापुढे त्यांचेच भाचे शिवसेनेचे अभिजित कदम यांनी आव्हान दिले आहे. शिंदे भाजपच्या उमेदवारीवर मुलुंड पूर्वच्या प्रभाग १०६ मधून निवडणूक लढवत आहेत. तर, त्यांच्या चुलत बहिणीचा पुत्र अभिजित त्याच प्रभागात शिवसेनेतर्फे मैदानात उतरला आहे. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या काकांविरोधातच बंड पुकारले होते. ठाकरे आणि मुंडे या दोन्ही पुतण्यांनी काकांच्या वारसदारांच्या तोंडाला फेस आणला होता.

शिवसेनेचे दादरमधील उपविभाग प्रमुख अश्‍विन शहा यांच्या पत्नी रोशन शहा काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत आहेत. तर, पश्‍चिम उपनगरात मनसेच्या नगरसेविका शिल्पा चोगले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्यांचा पुत्र विक्रम चोगले मागाठाणे येथील प्रभाग क्रमांक १२ मधून भाजपच्याच तिकीटावर निवडणूक लढवत आहे. त्यांची बहीण प्रिती दांडेकर प्रभाग क्रमांक १६ मधून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवत आहे.

मुंबई

कल्याण : उद्या 25 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे, त्यापूर्वी गणेशोत्सव काळात लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी आणि...

02.24 PM

सैनिक हो तुमच्या साठी... च्या गिताने उपस्थितांच्या चेहऱ्यावर ओघळले अश्रू मुंबई : वर्षभर आपले कुटुंबिय आणि देशासाठी लढणाऱ्या...

01.24 PM

मुंबई - अकार्यक्षम ठरलेल्या "बेस्ट'च्या 550 बस वर्षभरात भंगारात काढल्यानंतर आता 453 बस भंगारात काढण्याचा प्रस्ताव बेस्ट...

04.24 AM