मुंबईत अघोषित आचारसंहिता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नगरसेवक निधी वापरण्यावर निर्बंध; विकासकामे ठप्प
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमुळे नगरसेवक, आमदार आणि खासदार निधी वापरण्यावर निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केली असून, नगरसेवक निधीच्या वापरावर निर्बंध आणून अघोषित आचारसंहिताच लागू केली आहे, असा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी शुक्रवारी केला. निधीवरील निर्बंधांमुळे अनेक वॉर्डांतील विकासकामे ठप्प झाल्याबद्दल विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पालिकेच्या महासभेत संताप व्यक्त केला.

आयुक्तांच्या अघोषित आचारसंहितेमुळे नगरसेवकांची वॉर्डातील विकासकामे ठप्प झाली आहेत. पालिका निवडणुकीच्या तोंडावर आम्ही नागरिकांना कसे सामोरे जायचे, असा सवाल एका हरकतीच्या मुद्द्याद्वारे समाजवादी पक्षाचे नगरसेवक याकूब मेमन यांनी महासभेत उपस्थित केला. नगरसेवकांचा निधी रोखणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. 7 डिसेंबरपासून नगरसेवक निधी रोखला आहे. 20 डिसेंबरपासून नगरसेवकांचे मोबाईल काढून घेण्यात आले आहेत. पालिका आयुक्तांच्या या अघोषित आचारसंहितेमुळे प्रभागांतील नागरी कामांवर विपरीत परिणाम झाला आहे. नगरसेवकांची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे नगरसेवकांना आगामी निवडणुकीला सामोरे जाताना अडचणी निर्माण होत आहेत.