भाज्या महागल्या!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

नवी मुंबई - उन्हाचा तडाखा वाढला असल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे. बाजारात येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण घटल्यामुळे त्यांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींना खर्चाचा ताळमेळ घालताना कसरत करावी लागत आहे.

उन्हाळ्यात भाजीपाल्याच्या उत्पादनात घट होत असल्याने आवक कमी होते. त्याचा परिणाम आता बाजारात दिसत आहे. घाऊक बाजारात आतापर्यंत दररोज येणाऱ्या ६०० ते ६५० गाड्यांऐवजी आता केवळ ५०० गाड्या येत आहेत. त्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक भाजीपाला बाजारात भेंडी २० ते २४, दुधी १२ ते २०, फरसबी ४० ते ६०, गाजर १४ ते २०, गवार १३ ते ३०, घेवडा २५ ते ३५, कारली १८ ते २३, सिमला मिरची १२ ते १८, शेवगा १६ ते २२, वांगी १२ ते १६ रुपये किलो आहेत. चार महिने हे भाव निम्मे होते. त्यामुळे किरकोळ बाजारात भेंडी ३० ते ३५, भोपळा १५ ते २०, फरसबी ५०, गाजर ३०, घेवडा ३०, कारली २० ते ३०, सिमला मिरची २५ ते ३०, शेवगा २५ ते ३०, वांगी २० ते २५ किलो आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत हे भाव वाढलेले आहेत.

Web Title: Vegetables are expensive