व्हर्च्युअल क्‍लासरूम आता अधिक वेगवान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मुंबई - ज्ञानदानात महापालिकेचे विद्यार्थी इतर खासगी शाळा आणि अन्य बोर्डांच्या तुलनेत कमी पडू नयेत यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. घरात असतानाही शिकणे विद्यार्थ्यांना आता शक्‍य होणार आहे. पालिका यासाठी अधिक सक्षम अशा इंटरनेट सुविधेचा उपयोग करणार आहे. यासाठी सुमारे 22 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पालिकेच्या शाळांत "व्हर्च्युअल क्‍लासरूम'सारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरून शिक्षण दिले जात आहे. आता इंटरनेट तंत्रज्ञानातील प्रगती आणि इंटरनेटचा वाढलेला वेग लक्षात घेऊन "व्हर्च्युअल क्‍लासरूम' उपग्रहाऐवजी इंटरनेटवर आधारित अभ्यास करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे भविष्यात "व्हर्च्युअल क्‍लासरूम'चे प्रक्षेपण अधिक वेगवान आणि तुलनेने अधिक चांगल्या दर्जाचे होणार आहे. विशेष म्हणजे "व्हर्च्युअल क्‍लासरूम' इंटरनेटवर आधारित केल्याने विद्यार्थ्यांना घरात असतानाही व्याख्याने ऐकणे शक्‍य होईल. येत्या वर्षात आणखी 202 शाळांत "व्हर्च्युअल क्‍लासरूम' सुरू होणार आहेत. त्यामुळे अशा शाळांची संख्या 682 होईल, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त मिलिंद सावंत यांनी दिली.

"व्हर्च्युअल क्‍लासरूम'ची जानेवारी 2011 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात केली. या वेळी 24 मनपा शाळांचा समावेश होता. यात वाढ करण्यात आल्याने ही संख्या 480 वर पोहचली आहे. यामध्ये मराठी शाळा, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे.