ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचे निधन 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 मे 2017

मुंबई - सत्तर वर्षांहून अधिक काळ नाट्यक्षेत्रात रंगभूषेची जबाबदारी समर्थपणे पेलणारे ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर (वय 85) यांचे सोमवारी (ता. 15) सायंकाळी मूत्रपिंडाच्या विकाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी कल्पना, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

वयाच्या अकराव्या वर्षी बोरकर यांच्या "सूडाची प्रतिज्ञा' या कामगार रंगभूमीवर सादर झालेल्या नाटकापासून कारकिर्दीला सुरुवात झाली. "दो आँखे, बारह हाथ', "नवरंग', "मौसी' या चित्रपटांसाठी त्यांनी सहायक रंगभूषाकार म्हणून काम केले होते. राजकमल निर्मित व केशवराव दाते दिग्दर्शित "शिवसंभव' या नाटकासाठी ते प्रमुख रंगभूषाकार होते. त्यानंतर पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित "पृथ्वी गोल आहे' या व्यावसायिक नाटकात त्यांनी स्वतंत्र रंगभूषाकार म्हणून काम केले. प्रभाकर पणशीकर व मोहन वाघ यांच्यासोबत त्यांनी "नाट्यसंपदा'मध्येही काम केले. "नाट्यसंपदा'मधून मोहन वाघ बाहेर पडल्यानंतर त्यांनी "चंद्रलेखा'ची स्थापना केली. बोरकर यांनी "चंद्रलेखा'च्या गारंबीचा बापू, गरुडझेप, स्वामी, हे बंध रेशमाचे, गुड बाय डॉक्‍टर, रमले मी, दीपस्तंभ, गगनभेदी, रणांगण या नाटकांसाठी रंगभूषाकार म्हणूनही काम केले होते. "रंगशारदा', "श्री रंगशारदा' या नाट्यसंस्थांसोबतच केशवराव दाते, बाबूराव पेंढारकर, नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम, वसंत शिंदे, मधुकर तोरडमल, डॉ. काशिनाथ घाणेकर, यशवंत दत्त आणि अन्य दिग्गज कलाकारांचे रंगभूषाकार म्हणून त्यांनी काम केले होते. 

मॅन ऑफ दि इयर 
"गुड बाय डॉक्‍टर' या नाटकातील रंगभूषेसाठी त्यांना "नाट्यदर्पण'चा "मॅन ऑफ दि इयर' हा पुरस्कार मिळाला होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. राज्य सरकार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेबरोबरच अनेक संस्थांनी त्यांना गौरवले होते. 

Web Title: Veteran actor Krishna Borkar passed away

टॅग्स