विधिमंडळ समितीकडून द्रुतगती मार्गाची पाहणी

Anil-Gote
Anil-Gote

खोपोली - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाढत्या अपघातांवर उपाययोजना सुचविण्यासाठी विधिमंडळाने नियुक्त केलेल्या समितीने मंगळवारी (ता. 12) या मार्गाची पाहणी करून नागरिकांच्या तक्रारी नोंदवल्या. प्रवाशांची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची असून त्यासाठीच्या उपाययोजनांचा विशेष अहवाल लवकरच सरकारला सादर केला जाईल, असे या समितीचे अध्यक्ष आमदार अनिल गोटे यांनी या वेळी सांगितले.

समितीने पनवेल ते खंडाळा घाट या अंतराची पाहणी केली; तसेच प्रवाशांच्या व वाहनचालकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर खालापूर टोलनाक्‍यावर विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिक, विविध सामाजिक संस्थांकडून निवेदने स्वीकारली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com