विजय मल्ल्यांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

मुंबई - उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या विरोधात विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यामुळे आता ब्रिटनमध्ये असलेल्या मल्ल्यांच्या अटकेच्या कारवाईला वेग येऊ शकतो.

विजय मल्ल्या मार्चपासून ब्रिटनमध्ये आहेत. त्यांच्या विरोधात न्यायालयाने विदेशातील न्यायालयाकडे साह्याची विनंती केली आहे. त्यामुळे मल्ल्यांचा ताबा भारतीय पोलिसांना मिळू शकतो. मल्ल्या यांनी अनेक बॅंकांसह एअर इंडियाची कोट्यवधी रुपयांची कर्जे थकवली आहेत. सध्या त्यांचे कर्ज रिझर्व्ह बॅंकेने बुडीत खात्यात जमा केले आहे.