वाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

राजेंद्र लोथे
शनिवार, 26 मे 2018

खेड - तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्यातील वाडा प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर असून, दिवसेंदिवस समस्यांच्या गर्तेत जात आहे. वारंवार येथील वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने रुग्णसेवा कोलमडली आहे. त्यामुळे सरपंच रघुनाथ लांडगे यांच्यासह ग्रामस्थांनी एकत्र येत प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकले.

वाडा प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांचे हक्काची आरोग्य सेवा असून, येथे रोज 70 ते 80 रुग्ण उपचारासाठी येतात, तर शनिवारी आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी सुमारे 200 ते 250 रुग्ण येतात. शनिवार ता 26 रोजी सकाळी 60 ते 70 रुग्ण उपचारासाठी आले असताना डॉक्टर नसल्याने तपासणी होत नव्हती. माहिती घेतली असता प्रत्यक्षात येथे दोन डॉक्टराची पोस्ट असताना सोमवार ता 21 पासून येथे डॉक्टर गैरहजर असल्याचे समोर आले. या घटनेची माहिती सरपंच रघुनाथ लांडगे यासह सुरकुले ज्ञानेश्वर, अक्षय केदारी, झाकीर तांबोळी, उमेश वाडेकर, विठ्ठल वाडेकर, मनोहर पोखरकर, दत्ता वाळुंज, दत्ता केदारी यांसह अन्य नागरिकांना कळताच सगळ्यांनी एकत्र येत आरोग्य केंद्राला टाळे ठोकले.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश गोरे यांना विचारले असता, ते म्हणाले येथे दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यापैकी डॉक्टर डहाळे हे प्रवेशासाठी गेलेले असून, दुसऱ्या महिला अधिकारी आजारी असल्याने गैरहजर आहेत. मात्र सोमवार ता 28 रोजी येथे वैद्यकीय अधीकारी येतील व रुग्णसेवा सुरळीत सुरू होईल.

Web Title: Villagers closed wada primary health centers