पालघर - वाड्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्र बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

वाडा (पालघर) : पालघर लोकसभेची निवडणूक आज होत असून मतदानाच्या दिवशी वाडा तालुक्यातीलअनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्र काही तास बंद राहिल्याने मतदारांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली. मशीन बंदमुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची भीती राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.  

वाडा तालुक्यात 44 मतदान केंद्रे आहेत. यापैकी खरीवली पौलबारे येथील मतदान केंद्रावर सकाळी नऊ वाजता मतदान यंत्र बंद झाले त्यानंतर ते बारा वाजण्याच्या सुमारास सुरू करण्यात आले. अशी माहिती केंद्राध्यक्ष उत्तम ठवरे यांनी दिली. बिलोशी मतदान केंद्रावरील मतदान यंत्र 9 वाजता बंद पडले ते 11 वाजता सुरू करण्यात आले. त्यानंतर पुन्हा हे मशीन काही काळ बंद पडले होते. अशी माहिती केंद्राध्यक्ष किरण देसाई यांनी दिली. देवघर येथील मतदान यंत्र 9 वाजून पाच मिनिटांनी बंद झाले होते ते अकरा वाजता सुरू करण्यात आले. खुटल व ब्राह्मणगाव येथील मतदान यंत्रही काही काळ बंद होते.  

मतदान यंत्रे बंद असल्याने मतदारांना काही काळ ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.या मतदान यंत्रे बंदमुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची भीती राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. 

Web Title: voting machines are off in wada palghar