तीन पालिकांसाठी आज मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबई - चंद्रपूर, परभणी व लातूर महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (ता.19) मतदान होत असून 201 जागांसाठी एक हजार 285 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 7 लाख 92 हजार 720 मतदारांसाठी 1 हजार 19 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्र आदर्शवत करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरवात होईल. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदारांच्या सोयीसाठी मतदानाची वेळ सायंकाळी 5.30 ऐवजी 6.30 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर पुरेशा सावलीची व पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. दिव्यांगांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी रॅम्प, व्हीलचेअरसारख्या सुविधादेखील उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. तिन्ही ठिकाणी 21 एप्रिल 2017 रोजी मतमोजणी होणार आहे.