...तर लाल दिवा गमवावा लागेल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मुंबई - कॉंग्रेसने लोकांची कामे केली नाहीत म्हणून लाल दिव्याच्या गाड्या गमावून सायकलवर फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आपणही लोकांची कामे केली नाहीत, तर लाल दिव्याच्या गाड्या गमवाव्या लागतील, असा इशारा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. 6) भाजपच्या मंत्र्यांच्या डोळ्यात अंजन घातले. 

चर्चगेटला झालेल्या वर्धापनदिन सोहळ्यात मंत्री आणि आमदारांचे कान टोचताना मुख्यमंत्री म्हणाले, "सत्ता ही समाजाच्या विकासासाठी लोकांनी दिलेली संधी असते हे विसरू नका. लोकांची कामे करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने भाजपला विकास करायचा आहे हे विसरू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले. लोकांची कामे करण्याच्या वृत्तीमुळे एकेकाळी सायकलवरून फिरणारे भाजपचे नेते आज लाल दिव्याच्या गाडीतून फिरत आहेत, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले. संघटनमंत्री व्ही. सतीश म्हणाले, "पारदर्शकता, संवेदनशीलता आणि विकास हे मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे विचारसूत्र आहे.