स्वखर्चातून भागविली पाच आदिवासी कुटुंबाची तहान

Tap connections Five tribal families their homes
Tap connections Five tribal families their homes

महाड - गरीबीमुळे स्वतंत्र नळजोडणी घेऊ न शकलेल्या शहरातील पाच आदिवासी कुटुंबांना स्वखर्चाने नळजोडणी देत महाड नगरपालिकेचे बांधकाम सभापती संदीप जाधव यांनी आपला आजचा वाढदिवस सामाजिक जाणिवेतून साजरा केला.

वाढदिवस म्हटला कि हारतूरे, गोडधोड व पैशाचा चुराडा आलाच परंतु संदीप जाधव याला अपवाद ठरले. भीमनगर परिसरात पाच आदिवासी कुटुंबे राहतात. महाड नगरपालिकेने सार्वजनिक पाणी जोडणीची पध्दत बंद केल्याने या पाचही कुटुंबांना पाण्याची गैरसोय सहन करावी लागत होती. आर्थिक परिस्थिती नसल्याने ते स्वतःची नळजोडणी देखील घेऊ शकत नव्हते. कुणीतरी नळजोडणीचा खर्च करून आम्हाला नळजोडणी मिळवून द्यावी यासाठी या कुटुंबांनी अनेकांकडे मागणी केली. पण कुणीही त्यांची दखल घेतली नाही. या कुटुंबांनी महाड नगरपालिकेचे बांधकाम सभापती संदीप जाधव यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. जोडणी शुल्क, पाईपलाईन साहित्य, पाणीपट्टी, प्लंबर, मजुरी हा सर्व खर्च स्वतः करीत अखेर जाधव यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून हा शब्द पूर्ण केला. याच आदिवासी कुटुंबातील पाच विद्यार्थी दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी यापूर्वीच दत्तक घेतले आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com