प. रेल्वेचे गुप्ता महाव्यवस्थापक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदाचा कार्यभार अनिलकुमार गुप्ता यांनी स्वीकारला. ते भारतीय रेल्वे सेवेतील (इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर) 1980 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी अलाहाबादमधील मोतीलाल नेहरू रिजनल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. यापूर्वी त्यांनी पूर्व रेल्वे, पश्‍चिम आणि मध्य रेल्वे, पूर्व-मध्य रेल्वे, उत्तर-मध्य रेल्वे आणि रिसर्च डिझाइन ऍण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांवर काम केले आहे. जर्मनी, चीन, फ्रान्समध्ये त्यांनी अभ्यासदौरेही केले आहेत.