जुन्या गॅझेट्‌सवर व्हॉट्‌सऍप बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

मुंबई - आपल्या जुन्या स्मार्टफोनवरील व्हॉट्‌सऍपसारखी लोकप्रिय सुविधा बंद होण्याच्या मार्गावर आहे. आपला स्मार्टफोन अपग्रेड झाला नाही, तर या सेवेला मुकावे लागणार आहे. 2016 अखेर ही सेवा जुन्या स्मार्टफोनवर बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे 2017 मध्ये जुन्या स्मार्टफोनवर ही सेवा वापरता येणार नाही.

आगामी वर्षात ग्राहकांसाठी अपेक्षित असलेल्या सेवा जुन्या स्मार्टफोनवर देता येणार नाहीत. त्यामुळे हे स्मार्टफोन अपडेट करण्याची गरज आहे. आयफोन वापरकर्त्यांमध्ये "आयफोन 3 जीएस'वर व्हॉट्‌सऍप वापरता येणार नाही. "आयओएस 6' ही ऑपरेटिंग सिस्टिम असणाऱ्या स्मार्टफोनवरही ही सेवा देता येणार नाही. चौथ्या जनरेशनपर्यंतच्या अपडेट नसलेल्या आयपॅडवरीलही ही सुविधा बंद होणार आहे. त्यासाठी "आयओएस 9.3' हे व्हर्जन अपडेट करावे लागेल. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिममध्येही 2.1 किंवा 2.2 हे व्हर्जन असलेल्या स्मार्टफोनला व्हॉट्‌सऍप सपोर्ट करणार नाही. व्हॉट्‌सऍप विंडोज 7 व्हर्जन असणाऱ्या सिस्टिमसाठी वापरता येणार नाही; पण ब्लॅकबेरी ऑपरेटिंग सिस्टिम, ब्लॅकबेरी 10, नोकिया एस 40, नोकिया सिम्बियन एस 60 या स्मार्टफोनसाठी व्हॉट्‌सऍप वापरता येईल.

मुंबई

खड्डे न बुजविल्याने कारवाई; 306 कोटी रुपये वसूल करणार मुंबई: गेल्या दोन वर्षांत पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यास...

03.03 AM

दुर्मिळ ग्रंथ अडगळीत; राज्य सरकारचा दिव्याखाली अंधार मुंबई : गाजावाजा करत वाचन संस्कृती रुजवण्यासाठी ग्रंथोत्सव साजरे करणाऱ्या...

02.03 AM

मुंबई : गोराईमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये शुक्रवारी झालेल्या हमरीतुमरीप्रकरणी परस्परविरोधी तक्रार दाखल झाल्याने बोरिवली पोलिसांनी...

01.24 AM