जुन्या गॅझेट्‌सवर व्हॉट्‌सऍप बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

मुंबई - आपल्या जुन्या स्मार्टफोनवरील व्हॉट्‌सऍपसारखी लोकप्रिय सुविधा बंद होण्याच्या मार्गावर आहे. आपला स्मार्टफोन अपग्रेड झाला नाही तर या सेवेला मुकावे लागणार आहे. 2016 अखेर ही सेवा जुन्या स्मार्टफोनवर बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे 2017 मध्ये जुन्या स्मार्टफोनवर ही सेवा वापरता येणार नाही.

आगामी वर्षात ग्राहकांसाठी अपेक्षित असलेल्या सेवा जुन्या स्मार्टफोनवर देता येणार नाहीत. त्यामुळे हे स्मार्टफोन अपडेट करण्याची गरज आहे. आयफोन वापरकर्त्यांमध्ये आयफोन 3 जीएसवर व्हॉट्‌सऍप वापरता येणार नाही. आयओएस 6 ऑपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या स्मार्टफोनवरही ही सेवा देता येणार नाही. चौथ्या जनरेशनपर्यंतच्या अपडेट नसलेल्या आयपॅडवरीलही ही सुविधा बंद होणार आहे. त्यासाठी आयओएस 9.3 हे व्हर्जन अपडेट करावे लागेल. ऍण्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीममध्येही 2.1 किंवा 2.2 हे व्हर्जन असलेल्या स्मार्टफोनला व्हॉट्‌सऍप सपोर्ट करणार नाही. व्हॉट्‌सऍप विंडोज 7 व्हर्जन असणाऱ्या सिस्टीमसाठी वापरता येणार नाही, पण ब्लॅकबेरी ऑपरेटिंग सिस्टीम, ब्लॅकबेरी 10, नोकिया एस 40, नोकिया सिम्बियन एस 60 या स्मार्टफोनसाठी व्हॉट्‌सऍप वापरता येईल.

मुंबई

विरार - मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने मॅजिक फिगर पार करून 61 जागांवर विजयी पताका फडकवली असली, तरी त्यांच्या यशात सिंहाचा...

05.24 AM

मुंबई  - आरे कॉलनीत मेट्रोची कारशेड उभारण्याकरिता 30 हेक्‍टर जागा घेण्याचा आटापिटा सरकार करत आहे; परंतु या व्यवहारात 18...

05.12 AM

मुंबई - कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे रखडलेले निकाल कधी जाहीर करणार, याची माहिती दोन दिवसांत देण्याचे आदेश मुंबई उच्च...

04.30 AM