अपक्षाचे स्वतःचे मत गेले कोठे?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबई - साकीनाका येथील एका अपक्ष उमेदवाराने स्वतःला मत दिले; परंतु त्याचे मत गेले कोठे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. कारण त्याला मिळालेल्या मतांची संख्या शून्य आहे.

मुंबई - साकीनाका येथील एका अपक्ष उमेदवाराने स्वतःला मत दिले; परंतु त्याचे मत गेले कोठे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. कारण त्याला मिळालेल्या मतांची संख्या शून्य आहे.

साकीनाका येथील प्रभाग 164 मधून अपक्ष म्हणून लढलेले श्रीकांत शिरसाठ यांना शून्य मते मिळाल्याने ते न्यायालयात दाद मागणार आहेत. शिरसाठ आपल्याच प्रभागातील मतदार आहेत; मात्र त्यांना शून्य मते मिळाल्याने ते आवाक झाले आहेत. शिरसाठ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांनाच मतदान केले होते. त्यांना कोणीही मतदान केले नाही, असे गृहीत धरले, तर कुटुंबांचे आणि त्यांचे स्वत:चे मत गेले कोठे, असा प्रश्‍न आहे. हा प्रश्‍न त्यांनी राज्य निवडणूक आयोगालाही विचारला आहे. निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांना त्यांनी पत्र पाठवले आहे.

Web Title: where is independent candidate vote