मद्यपान वयोमर्यादा 25 वर्षे करण्यासाठी याचिका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

मुंबई - सर्व प्रकारच्या मद्यपानाची वयोमर्यादा 21 वर्षे निश्‍चित करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबईतील महानगरपालिकेच्या रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी केली आहे.

मुंबई - सर्व प्रकारच्या मद्यपानाची वयोमर्यादा 21 वर्षे निश्‍चित करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबईतील महानगरपालिकेच्या रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी केली आहे.

मद्यपानाची वयोमर्यादा निश्‍चित करताना राज्य सरकारने किचकट अटी ठेवल्या आहेत. ज्याने सर्वसामान्यांप्रमाणे दुकानदारांमध्येही गैरसमज होऊ शकतो. सर्वाधिक अल्कोहोलचे प्रमाण असलेली वाईन 18 वर्षीय व्यक्ती पिऊ शकते; तर त्यापेक्षा कमी अल्कोहोल असलेली बिअर पिण्यासाठी 21 व्या वर्षाची मर्यादा घालण्यात आली आहे. हा गोंधळ टाळण्यासाठी सरकारने मद्यपानाची वयोमर्यादा 25 अशी निश्‍चित करण्याचे आवाहन या याचिकेत केले आहे.

मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करत असताना व्यसनमुक्तीसाठीही काम करावे लागते. अनेकदा व्यसनमुक्तीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये 18 ते 19 वर्षे वयाची मुलेही असतात. व्यसनाकडे वळणारी तरुणांची पावले कमी करण्यासाठी ही मयोमर्यादा निश्‍चित करणे आवश्‍यक असल्याचे डॉ. मुंदडांचे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिल्याचे या पिटिशनमध्ये नमूद केले आहे.