वाईन शॉपमालकाचा गोरेगावमध्ये खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

मुंबई - गोरेगावमध्ये वाईन शॉपच्या मालकाचा गोळ्या झाडून खून झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. सदनीसिंग चावडा (४७) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावून आले होते, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. 

सदनीसिंग मालाडमधील बांगूरनगरमध्ये पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. त्याचे गोरेगाव पूर्वेला वाईन शॉप आहे. रविवारी रात्री ते दुकान बंद करून ते कमलेश यादव या सहकाऱ्यासोबत घरी जात होते. सदनीसिंग यांच्याजवळ अडीच लाख रुपयांची रक्कम होती. सदनीसिंग ११.१५च्या सुमारास वीरवानी इस्टेटजवळून जात असताना चेहऱ्यावर मास्क लावून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर मागून गोळी झाडली. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्याजवळील पैशांची बॅग हिसकावून पळ काढला. गस्तीवर असलेल्या पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदनीसिंग यांना उपचारासाठी प्रथम जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये आणि नंतर अंधेरीतील कोकीलाबेन रुग्णालयात नेले. डॉक्‍टरांनी सदनीसिंग यांना मृत घोषित केले. हल्लेखोरांनी गोळीबार करण्यासाठी गावठी पिस्तुलाचा वापर केल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेची मदत घेतली जाणार आहे. तपासासाठी पोलिसांची सात पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती परिमंडळ १२ चे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.

Web Title: Wine shopkeeper murdered in Goregaon