हॉंगकॉंगला 990 कोटी पाठवणाऱ्या महिलेला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

मुंबई - हॉंगकॉंगला 990 कोटी रुपये पाठवल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कृतिका दहाल (34) हिला शनिवारी (ता. 25) अटक केली.

कृतिका हिने इंटरनॅशनल रायजिंग ही कंपनी स्थापन करून तिच्यामार्फत 990 कोटी हॉंगकॉंगला पाठवले. या कंपनीची ती संचालक आणि समभागधारक आहे. याशिवाय हॉंगकॉंगमधील बॅंक खातीही तिने मुख्य आरोपीच्या सांगण्यावरून उघडली असल्याची माहिती ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

परळ येथील राजेश्‍वर एक्‍स्पोर्ट या हिऱ्यांचा व्यापार करणाऱ्या कंपनीमार्फत 1500 कोटी हॉंगकॉंग आणि दुबईला पाठवण्यात आल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला होता. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीच्या काळात आपल्या खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा केल्यामुळे राजेश्‍वर एक्‍स्पोर्ट डिसेंबरमध्ये प्रथम रडारवर आली होती. त्यानंतर या कंपनीचे व्यवहार तपासले असता, वर्षभरात तिच्या खात्यावरून 1500 कोटी हॉंगकॉंग आणि दुबईला पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम पाठवण्यासाठी 10 बनावट कंपन्या आणि 25 खात्यांचा वापर झाला. शेल कंपन्यातून 25 खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यात आली. त्यानंतर ही रक्कम दुबई आणि हॉंगकॉंगमधील बॅंकांच्या खात्यांवर जमा करण्यात आली. याबाबतचा तपास ईडी करीत आहे. ही रक्कम राजकीय व्यक्तीची असल्याचा ईडीला संशय आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Web Title: women arrested