महिला आयोगाची तुरुंग प्रशासनाला नोटीस

Bhaykhala-Jail
Bhaykhala-Jail

मुंबई - राज्य महिला आयोगाच्या सदस्य आणि शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी शनिवारी भायखळा तुरुंगाची पाहणी केली. जेजे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलांनी आयोगाच्या सदस्यांकडे जेवणाच्या तक्रारींचा पाढा वाचला. याबाबत महिला आयोग तुरुंग प्रशासनाला नोटीस पाठवणार आहे. शनिवारी सायंकाळी त्रास जाणवू लागल्याने पाच जणांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तुरुंगात बाधा झाल्याने ८७ जणांना उपचाराकरिता जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याची दखल घेत पाणी आणि जेवणाचे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तुरुंगातील बाधाप्रकरणी शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी भायखळा तुरुंगाची पाहणी केली. देशात आतापर्यंत तुरुंगात झालेल्या विषबाधेच्या घटनांची उच्चस्तरीय चौकशी झालेल्या आहेत. २०१३ मध्ये गोव्यातही १०० कैद्यांना विषबाधा झाली होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी कायंदे मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत.

सर्व तुरुंग अधिकाऱ्यांना सूचना
विशेष म्हणजे जेवणाबाबत तुरुंग प्रशासनाची द्विधा मनस्थिती होते. जेवण कोणत्या प्रकारचे द्यावे, हा मोठा प्रश्‍न असतो. डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अपर पोलिस महासंचालक (तुरुंग प्रशासन) यांनीही भायखळा तुरुंगात जाऊन पाहणी केली. भायखळ्यासारख्या घटना घडू नयेत. स्थानिक आरोग्य सेवकांची मदत घ्यावी, अशा सूचना त्यांनी राज्यातील सर्व तुरुंग अधिकाऱ्यांना केल्या.

तक्रारींचा पाढा
राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. आशा लांडगे, विंदा कीर्तीकर तसेच प्रकल्प अधिकारी सुनीता गणगे यांनी शनिवारी दुपारी भायखळा तुरुंग आणि जेजे रुग्णालयात जाऊन महिला कैद्यांची विचारपूस केली. या वेळी महिलांनी जेवणाच्या तक्रारीचा पाढा आयोगासमोर वाचला. याची दखल घेत आयोग भायखळा तुरुंग प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहे.

७९ कैद्यांना डिस्चार्ज
विषबाधाप्रकरणी जेजे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ७९ महिला आरोपी रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने आज डिस्चार्ज देण्यात आला.शुक्रवारी दाखल झालेल्या ८७ रुग्णांपैकी ७९ रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल सामान्य आल्याने डिस्चार्ज दिला गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com