गेट वे ते एलिफंटापर्यंत महिलांसाठी मोफत सहल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

मुंबई - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुधवारी (ता. 8) महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे (एमएमबी) प्रथमच महिलांकरता गेट वे ते एलिफंटापर्यंत मोफत सागरी सहलीचा आनंद लुटता येणार आहे. या सहलीत महिलांना अल्पोपाहारही दिला जाईल.

"एमएमबी' आणि महेश टुर्स ऍण्ड ट्रॅव्हलस सहकार्याने बुधवारी सकाळी 9 आणि दुपारी 12 वाजता महिलांसाठी विशेष फेरी बोट चालवली जाणार आहे. या मोफत सागरी सफरीत महिलांना अल्पोपाहार आणि पाण्याची मोफत व्यवस्था आहे. तसेच, एलिफंटा जेट्टीवर उतरल्यावर मिनी ट्रेन आणि घारापुरी लेण्यांच्या दर्शनाचा लाभही महिलांना मिळेल, अशी माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांनी दिली. सरकारी महिला कर्मचारी संघाच्या प्रतिनिधींनाही सहलीत सहभागी होण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.