कामाच्या शोधात गेलेल्या महिलेचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा

कामाच्या शोधात गेलेल्या महिलेचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा

उल्हासनगर- गावावरून नातेवाईकांकडे आलेली महिला धुणी-भांडयांच्या कामाच्या शोधात घराबाहेर पडली. मात्र, पहिल्याच दिवशी ती लिफ्टच्याखाली सापडून मृत्युमुखी पडली. काम शोधण्याचा पहिलाच दिवस अखेरचा ठरलेल्या या महिलेचा मृतदेह तीन दिवसानंतर  लिफ्टच्याखाली मिळाला.

सरस्वती पवार या 40 वर्षीय महिलेची ही दुर्दैवी कहाणी आहे. ही महिला उल्हासनगरातील कँम्प नंबर 4 मध्ये आत्मारामनगरात राहणाऱ्या नातलगांकडे गावावरून राहण्यास आली होती. ती 14 सप्टेंबर रोजी कॅम्प नंबर 3 मध्ये असलेल्या सपना गार्डन समोरील सती अपार्टमेंटमध्ये कुणाकडे धुणीभांडीचे काम मिळण्याच्या शोधात केली होती. पण सरस्वती दिवसभर आणि रात्र होत आल्यावरही घरी परतली नसल्याने तिच्या नातलगांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

पोलिस व तिचे नातेवाईक तिचा शोध घेत असतानाच, काल सायंकाळच्या सुमारास सती अपार्टमेंटच्या लिफ्टजवळ मोठयाप्रमाणात दुर्गंधी येऊ लागल्याने नागरीकांनी जाऊन पाहणी केली असता, लिफ्टच्या खालील मोकळया जागेत सरस्वती या महिलेचा सडलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह मिळून आला. या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन पंचनामा करून तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. हा सरस्वती पवार हिचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.

सरस्वती हिचा मृत्यू नेमका कसा झाला? हे अद्याप समजले नसले तरी ती पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिपक दाभाडे हे अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com