तरुणांनी स्वतःची कविता लिहावी - गुलजार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

मुंबई - आजच्या काळातील तरुण पिढी जुन्याच कवितांचा कित्ता गिरवते. त्यामुळे त्यांच्याकडून कविता हरवत आहे, असे वाटते. या पिढीने स्वतःच्या कवितेची निर्मिती केली तरच कवितेत कालानुरूप बदल होईल. कवितांत प्रादेशिक भाषांचा सूर उमटतो आहे. त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ हिंदी कवी गुलजार यांनी केले.

"टाटा लिटरेचर लाइव्ह फेस्ट'मध्ये ज्येष्ठ कवी गुलजार यांना "राजकवी' पुरस्काराने गौरवण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. यानंतर माजी सनदी अधिकारी पवन वर्मा यांनी गुलजार यांच्याशी संवाद साधला. या वेळी गुलजार म्हणाले की, भारतीय कवितांचा चेहरा कुणा एका भाषेत प्रतिबिंबित होणार नाही. त्यासाठी अनेक भाषा शिकण्याची गरज आहे. मी स्वतः 276 कविता 32 भाषांत अनुवादित केल्या आहेत. ईशान्य भारतातील कविता वैविध्यपूर्ण आहेत. या कवितांतून खूप काही व्यक्त होत आहे. छोट्या छोट्या प्रांतांतून आज कवी-लेखक व्यक्त होत आहेत; पण आपण त्याकडे कधीच लक्ष दिले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अनुवाद ही काळाची गरज आहे, असे गुलजार म्हणाले.

मुंबई

मुंबई : दादर चौपाटीवर रविवारी (ता.20) आढळलेले माशाचे मृत पिल्लू हे डॉल्फिन नसून व्हेलचे होते, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे; तर...

08.48 PM

महिलांनी घेतली प्लास्टिक पिशव्या न वापरण्याची शपथ मुंबई : श्रावणी अमावस्या, सोमवती अमावस्या आणि पिठोरी अमावस्या असा तिहेरी...

07.24 PM

मुंबई : निकालांचा गोंधळ सुरू असल्याने काही महाविद्यालयांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याच्या...

07.06 PM