झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र वॉरंट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

मुंबई - वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्याविरोधात विशेष पीएमएलए न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले. याबाबतचे आदेश न्यायालयाने गुरुवारी दिले. 

मुंबई - वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्याविरोधात विशेष पीएमएलए न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले. याबाबतचे आदेश न्यायालयाने गुरुवारी दिले. 

सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अनेकदा समन्स पाठवूनही नाईक चौकशीसाठी उपस्थित राहिला नाही, त्यामुळे तो तपासाला मदत करत नसून संपूर्ण प्रक्रियेमुळे तीन महिने वाया गेले. त्यामुळे याप्रकरणी त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी सोमवारी न्यायालयाकडे करण्यात आली होती. नाईकने ई-मेल व त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही चौकशीला सामोरे जाण्याची मागणी केली होती; पण ईडीने त्याला नकार दिला होता. या वॉरंटमुळे नाईकच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे. वॉरंटनंतर आता ईडी नाईकचे पारपत्र रद्द करण्याची मागणी करण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर त्याच्याविरोधात "एलआर' तसेच रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्याची मागणी करू शकते. या सर्व कायदेशीर प्रक्रिया असून त्या वेळोवेळी केल्या जातील, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.