झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र वॉरंट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

मुंबई - इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक झाकीर नाईकविरोधात विशेष दहशतवादविरोधी पथकाच्या (एनआयए) न्यायालयाने गुरुवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. गेल्याच आठवड्यात ईडीच्या विशेष न्यायालयानेही नाईकविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून एनआयएने नाईकविरोधात गेल्या वर्षी यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयात हजर राहण्यासाठी त्याला तीन वेळा समन्सही बजावले होते; मात्र तो न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने विशेष एनआयए न्यायालयाचे न्या. व्ही. व्ही. पाटील यांनी हे वॉरंट जारी केले. नाईक सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये असल्याचा एनआयएच्या अधिकाऱ्यांचा संशय आहे.