रेल्वे बॉंबस्फोट प्रकरणीही झाकिर नाईकची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

मुंबई - धर्मगुरू डॉ. झाकिर नाईक यांची मुंबईत 2006 मध्ये झालेल्या रेल्वे बॉंबस्फोट प्रकरणीही दहशतवाद विरोधी पथकाने चौकशी केल्याचे आता पुढे आले आहे. याबाबत दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख रघुवंशी यांनी सांगितले, की या बॉंबस्फोट प्रकरणी आम्ही त्याच्या डोंगरी येथील कार्यालयाची झडती घेतली होती. मात्र आम्हाला ठोस काही हाती न लागल्याने आम्ही त्याला जाऊ दिले.

रेल्वेतील या स्फोटानंतर दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयात नाईक याला चौकशीसाठी बोलविले होते, असे ते म्हणाले.

भाषणांवर बंदी
या स्फोटानंतर मुंबई पोलिसांनी नाईक याच्या सार्वजनिक सभांवर बंदी घातली होती. ओसामा बिन लादेन याला दहशतवादी मानण्यास त्याने नकार दिल्यानंतर ब्रिटन आणि कॅनडा येथील गुप्त बैठकांवरही बंदी आणण्यात आली होती. त्याचप्रमाणे मलेशियानेही त्याच्यावर बंदी घातली होती. मुंब्रामध्येही कोणतीही सभा घेण्यास त्याला प्रतिबंध करण्यात आला होता.

Web Title: Zakir Naik train blast probe