जबरी चोरीच्या घटनांमध्ये नांदेड जिल्ह्यात वाढ

दोन दिवसात तीन घटना; मारहाण करून लुटले; तीन लाखांचा ऐवज लंपास
crime update nanded theft case  Beaten and robbed
crime update nanded theft case Beaten and robbedsakal

नांदेड : जिल्ह्यात चोरी, घरफोडी तसेच जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसात जबरी चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. यामध्ये चोरट्यांनी मारहाण करून तर दुसऱ्या घटनेत डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटले आहे. या तीन घटनेत जवळपास तीन लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड ते नायगाव रस्त्यावर कापशी गुंफा मंदिराजवळून (ता. लोहा) परबत लक्ष्मण कांबळे (वय ४५, रा. जंगमवाडी, नांदेड) हे दुचाकीवरून (एमएच २६ बीआर १३३६) नातेवाईकांचे पैसे देण्यासाठी कामळजपल्ली (ता. बिलोली) येथे जात होते. त्यावेळी सोमवारी (ता. २५) रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांनी तीन चोरट्यांनी अडवले. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील एक लाख रुपये असलेली बॅग जबरीने हिसकाऊन घेतली तसेच खिशातील पाकीट, दहा हजाराचा मोबाईल आणि पन्नास हजाराची दुचाकी असा एकूण एक लाख ६० हजाराचा ऐवज जबरीने चोरून नेला. या घटनेत ते जखमी झाले. याबाबत उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत मुदखेड ते वरदळा रस्त्यावर तांडा रेल्वे ओव्हरब्रिज जवळून (ता. मुदखेड) नरेश वामनराव सगर (वय ३१, रा. महादेव मळा, तरोडा खुर्द, नांदेड) हे दुचाकीवरून मंगळवारी (ता. २६) दुपारी तीनच्या सुमारास जात होते. त्यावेळी तोंडास व डोक्यास रुमाल बांधलेल्या २५ ते ३० वयोगटातील तीन चोरट्यांनी विना क्रमांकाच्या दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. दुचाकीसमोर येऊन ती अडवून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्या खिशातील दहा हजाराचा मोबाईल तसेच पाच हजाराची पिटी प्रिंटर मशीन असलेली लेदर बॅग असा १५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला फौजदार भोंडवे करत आहेत.

तिसऱ्या घटनेत हिमायतनगर तालुक्यातील पोटा शिवारातून भारत फायनान्स इन्कल्युजनचे फिल्ड आॅफिसर सुमेश लक्ष्मण डोंगरे (वय २५, रा. जामदरी, ता. भोकर) हे दुचाकीवरून (एमएच २६ - बीएस - ६५२३) वसुलीसाठी बळीराम तांडा येथून कर्जाची वसुल झालेली रक्कम एक लाख १५ हजार रुपये घेऊन मंगळवारी (ता. २६) दुपारी पावणेचारच्या सुमारास जात होते. त्यावेळी दोन चोरट्यांनी त्यांच्या पाठीमागून येऊन डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यानंतर त्यांची पैसे असलेली बॅग जबरीने चोरून नेली. याबाबत हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महाजन करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com