ॲमेझॉनमध्ये नोकरी; पंचेचाळीस लाखाचे पॅकेज

‘एसजीजीएस’ च्या पद्मावती बासरकोडेचे यश : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ठरली प्रेरणास्थान
Nanded Amazon Jobs forty five lakh package Padmavati Basarkode
Nanded Amazon Jobs forty five lakh package Padmavati Basarkodesakal

नवीन नांदेड : श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था नांदेडच्या कॉम्प्युटर सायन्स विभागातील अंतिम वर्षात उत्तीर्ण झालेल्या पद्मावती बासरकोडे या विद्यार्थिनीची ॲमेझॉन या कंपनीत ४५ लाख रुपयांच्या पॅकेजने नोकरीसाठी निवड झालेली आहे. काही दिवसांपूर्वी याच संस्थेतील पराग पाटील या विद्यार्थ्याची मायक्रोसॉफ्टमध्ये ५२ लाख रुपयांच्या पॅकेजने नोकरीसाठी निवड झाली आहे. या दोन विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जागतिक नामांकित कंपन्यांचा दरवाजा उघडला आहे. पुढील दोन वर्षात या संस्थेतून गुगल, फेसबुक, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट अशा नामांकित कंपन्यांमध्ये अनेक विद्यार्थ्यांची निवड होण्यासाठी संस्थेने पावले उचललेली आहेत.

२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शिकत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ५८० अधीक पेक्षा जास्त नोकरीच्या ऑफर्स मिळाल्या असून ४२५ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच २०२३ या वर्षात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ता.२७ जून पासून प्लेसमेंट ड्रायव्ह सुरू आहेत. आणि सलग दहा कंपन्यांचे मुलाखतींचे वेळापत्रक ठरले आहे. अशी माहिती संस्थेचे डीन इंडस्ट्री लायझन व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ. रवींद्र जोशी यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून सातत्याने मेहनत केल्यास त्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे, असे संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला आहे. मागील दोन शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्याचे मिशन ३०० व ४०० निश्चित केले होते आणि त्यानुसार २०२१ यावर्षी ३२० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नोकऱ्या व २०२२ यावर्षी ४२० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना एम्प्लॉयबिलिटी कोर्सेस हे प्रथम व द्वितीय सत्रात शिकविले जातात. तसेच विद्यार्थ्यांचा ट्रेनिंग प्लेसमेंट सेल केला असून सर्व प्रक्रिया विद्यार्थी पाहत आहेत. प्लेसमेंटची प्रक्रिया ही सुपरसेट ऑटोमेशन प्लॅटफॉर्मवर केली जात आहे.

माजी विद्यार्थ्यांतर्फे एक्सपर्ट लेक्चर्स, मार्गदर्शन, इंटर्नशिप व प्लेसमेंटसाठी मदत मिळत आहे. विद्यार्थ्यांना इंटरंशिप मिळवून देण्यासाठी ट्रेनिंग-प्लेसमेंट विभागाने अल्युमिनी-स्टुडंट्स इंटर्नशिप मॉडेलचा वापर केला आहे. यात माजी विद्यार्थी, शिकत असलेले विद्यार्थी, ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग व विभाग प्रमुख यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून माजी विद्यार्थ्यांतर्फे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यात इंटर्नशिप मिळवून दिलेल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com