नांदेड ‘चाईल्ड से’ दोस्ती सप्ताह स्वाक्षरी मोहीम सुरु

नांदेड ‘चाईल्ड से’ दोस्ती सप्ताह स्वाक्षरी मोहीम सुरु

नांदेड - बालदिनाच्या निमित्ताने शनिवारी (ता. १४) ते (ता.२१) नोव्हेंबर या अनुषंगाने विविध बालकांशी संबंधीत यंत्रांना भेटी देवून त्यांना नांदेड चाईल्ड से दोस्ती बंध बांधून मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचे योजले आहे. 

शुन्य ते १८ वायोगातील मुलां-मुलींना साहाय्य आणि सांभाळ यांची गरज असणाऱ्या मुलांसाठी २४ तास मोफत आपत्कालीन राष्ट्रीय फोन सेवा १०९८ ही नांदेड शहरात २०१२ पासून कार्यरत आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांच्या माध्यमातून विविध प्रकारे मदतीची गरज असणाऱ्या मुलांना चाईल्ड लाईन १०९८ मार्फत सेवा पुरवली जाते. या मध्ये हरवलेली मुले सापडलेली मुले, अनाथ, शोषित मुले, बालविवाह, बालकामगार, बालभिक्षेकारी, मेडिकल, समुपदेशन, वैद्यकीय सुविधा निवारा मिळवून देणे, किशोरवयीन मुलांच्या विविध समस्या सोडवणे या माध्यमातून सेवा पुरवली जाते. 

ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धांचे आयोजन 

हा प्रकल्प महिला व बालविकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्या माध्यमातून देशभर सुरू असून, पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन सप्ताह साजरा करण्याचे ठरले आहे. सप्ताह दरम्यान मुलांचे विविध ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरवात महावीर चौक येथे स्वाक्षरी मोहीमेने करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्‍घाटन महापौर मोहिनी येवणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वाक्षरी मोहिमेस प्रतिसाद 

या वेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, परिवार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.डी. जोशी पाटोदेकर, भारत स्कॉऊड गाईड कार्यालयाचे दिगांबर करंडे, कुलकर्णी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता अभय परिहार, शंकर नांदेडकर, तसेच नगरसेवक, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच सामान्य नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेस उत्कृष्ठ प्रतिसाद दिला. या प्रसंगी नांदेड चाईल्ड लाईन १०९८ चे केंद्र समन्वयक बालाजी आलेवार, समुपदेशन आशा सूर्यवंशी, टिम मेंबर संगीता कांबळे, निता राजभोज, इंद्रजीत मोरे, आकाश मोरे, अश्विनी गायकवाड, जयश्री दुधाटे, स्वयंसेवक एकनाथ पाच्छे यांच्या सह सर्व नागरिकांनी सहभाग घेतला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com