राजापुरात गंगेचे आगमन; भक्‍तांना पर्वणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 सप्टेंबर 2016

राजापूर : येथील सुप्रसिद्ध गंगामाईचे बुधवारी (ता. 31) सकाळी सहाच्या सुमारास शहराजवळील उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. चौदा कुंडासह काशीकुंड आणि मूळ गंगेच्या ठिकाणी जोरदार प्रवाह आहे. भर पावसाळ्यामध्ये गंगा प्रकट होण्याचे सलग चौथे वर्ष आहे. त्यामुळे भाविकांना आश्‍चर्य वाटले. गंगेच्या आगमनानंतर स्नानासाठी भाविकांना पर्वणीच साधता येईल.
 
गतवर्षी आषाढी एकादशी दिवशी 27 जुलैला गंगा प्रकट झाली. ती 102 दिवस होती. ती, 5 नोव्हेंबरला लुप्त झाली. सुमारे आठ महिन्यांनंतर पुन्हा एकदा गंगामाईचे आगमन झाले. गेल्या काही वर्षांपासून तिचे प्रकटने वारंवार बदलते आहे. पावसात गंगामाईच्या आगमनाची माहिती मिळताच आधी अनेकांना ती अफवा वाटली. खात्रीसाठी अनेकांनी गंगातीर्थक्षेत्री धाव घेतली; तेव्हा गंगा प्रकट झाल्याचे ध्यानात आले. तेव्हा अनेकांनी स्नानाचीही पर्वणी साधली. गेली सलग चौथ्यावर्षी जून-ऑगस्टमध्ये गंगामाईने तीर्थक्षेत्री आगमन झाल्याने भक्‍त खूश झाले असले, तरी या बदलाचा अभ्यास करण्याची गरज जाणकारांनी व्यक्‍त केली.
 
भीषण पाणीटंचाईच्या काळामध्ये अनेक वेळा गंगा प्रकटली. असे सुमारे सोळावेळा घडले आहे. हे कालावधी पुढीलप्रमाणे ः जून 1885 (17 दिवस), ऑगस्ट 1893 (16 दिवस), जुलै 1895 (18 दिवस), जून 1897 (22 दिवस), जून 1915 (29 दिवस), सप्टेंबर 1918 (53 दिवस), त्यानंतर 18 वर्षाचा खंड, जुलै 1936 (12 दिवस), जून 1938 (27 दिवस), जुलै 1955 (48 दिवस), 4 जून 1981 (18 दिवस), 5 जून 1983 (21 दिवस), 10 जून 1995 (61 दिवस), 23 जून 2013 (23 जुलै 2014), 23 जुलै 2014 (ऑक्‍टोबर, 2014), 27 जुलै 2015 (102 दिवस), 31 ऑगस्ट 2016.
 
अभिषेकाची संधी हुकली
गंगामाई आणि श्रीदेव शंकराचे अतूट नाते मानले जाते. त्यातच, व्रतवैकल्यांच्या श्रावण मासात सोमवारी गंगाजलाने श्रीदेव धूतपापेश्‍वरला अभिषेक करण्यास विशेष महत्त्व आहे. अनेक भक्तांना अभिषेक करण्याची संधी होती; मात्र आज दुपारी अमावस्या लागली व श्रावण संपेल त्यामुळे गंगाजलाच्या अभिषेकाची संधी हुकली.

Web Title: Rajapur banks arrival; fear fun

टॅग्स