'शिवसेनेशी चांगले संबंध ठेवण्याची इच्छा' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

सोलापूर - शिवसेनेशी चांगले संबंध ठेवण्याची आमची इच्छा आहे; मात्र त्यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपप्रचार केला जात आहे. ते आपल्याला पटत नसल्याचे मत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू यांनी शुक्रवारी व्यक्त केले आहे. 

महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी नायडू आज सोलापुरात आले होते. त्या वेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी शिवसेनेबाबत आपले मत व्यक्त केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मोदी यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. त्याबाबत भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांमध्येही नाराजी असल्याचे आजच्या नायडू यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. केंद्रात व राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी आहे. असे असतानाही थेट पंतप्रधानांच्या बाबतीत अपप्रचार करणे भाजपमधील कोणत्याही नेत्याला रुचले नसावे, असे नायडू यांच्या वक्तव्यावरून दिसते. 

शिवसेनेने यापुढे पंतप्रधानांबद्दल बोलणे थांबवायला हवे, या नायडू यांनी केलेल्या या वक्तव्याचा शिवसेनेवर काय परिणाम होणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्तेत असणारे सगळे मंत्री राजीनामा देणार असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. त्यावर नायडू यांच्या मताचा काही परिणाम होतो का? हेही पाहावे लागणार आहे.

Web Title: Good relations to shiv sena