उरण तालुक्‍यात १७ उमेदवार कोट्यधीश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

उरण - उरण तालुक्‍यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत १७ उमेदवार कोट्यधीश आहेत. यातील काहींवर किरकोळ व गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. 

उरण - उरण तालुक्‍यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत १७ उमेदवार कोट्यधीश आहेत. यातील काहींवर किरकोळ व गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. 

जिल्हा परिषदेच्या नऊ उमेदवारांची स्थावर व जंगम मालमत्ता कोटींच्या अधिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात दाखविले आहे. यामध्ये नवघर जिल्हा परिषद गटात चार उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यामध्ये अपक्ष गोपाळ पाटील, भाजपच्या संगीता पाटील, शेकापच्या वैशाली पाटील, शिवसेनेचे विजय भोईर यांचा सामवेश आहे. जासई मतदारसंघातील श्‍वेता समीर मढवी, चिरनेर मतदारसंघातील काँग्रेसचे बाजीराव परदेशी, शिवसेनेचे संतोष ठाकूर, अपक्ष चंद्रहास म्हात्रे व चाणजे मतदारसंघातील रिना घरत या कोट्यधीश उमेदवार आहेत. 

पंचायत समितीच्या विंधणे गणातील सुमन पाटील, दिशा पाटील, जासई गणातील नरेश घरत, चाणजे गणातील शिवसेनेचे अमित भगत, दीपक चिवेलकर, चिरनेर गणातील शुभांगी पाटील, वीणा डाकी, आवरे गणातील समीधा म्हात्रे हे कोट्यधीश आहेत. भाजपचे उमेदवार दीपक चिवेलकर हे सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता १० कोटींच्या वर आहे. पंचायत समितीतील कांचन पाटील, मिलिंद पाटील, नरेश घरत यांच्यावर  गुन्हे दाखल आहेत; तर जिल्हा परिषदेच्या गोपाळ पाटील, विजय भोईर, वंदना कोळी व संतोष ठाकूर यांच्यावर गुन्हे आहेत. 

Web Title: Uran taluka and 17 candidates millionaire