लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढवा

हेमंत भालेराव
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- पुणे ते पिंपरी चिंचवड, आकुर्डी परिसरात रोज  अनेकजण नोकरी, व्यवसायासाठी व कॉलेजसाठी जातात. सकाळी आठ ते दहा या दोन तासात फक्त तीन लोकल आहेत. लोकल ट्रेन संख्येत वाढ झाली तर प्रवाशांना बसायला जागा मिळेल. प्रवास सुखकर होईल. लोकल ट्रेन साठी रेल्वे प्रशासनाने तिसरा मार्ग प्राधान्याने तयार करावा त्यामुळे सकाळी पुणे ते लोणावळा व संध्याकाळी लोणावळा ते पुणे गर्दीच्या वेळेत लोकल फेर्‍या वाढवणे शक्य होईल.