सर्वेक्षणात माळढोक हद्दपार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

सोलापूर - राज्यात गेल्या काही दिवसापासून विशेष सर्वेक्षण करण्यात आले. भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून व महाराष्ट्र वन्यजीव विभागाच्या वतीने माळढोक व इतर पक्षांची गणना करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये माळढोक पक्षी आढळलाच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

नामशेष होत चाललेल्या माळढोक पक्षांची संख्या राज्यामध्ये किती आहे, हे जाणून घेण्यासाठी डेहराडून संस्थेला माळढोक पक्ष्याच्या सर्वेक्षणाची जबाबदारी दिली होती. राज्यात 31 पथकांच्या मदतीने राबविलेल्या या मोहिमेत माळढोकसोबत हरिण, काळवीट, खोकड, लांडगा, ससा, चिंकारा या प्राण्यांचीही गणना झाली. आठ-दहा वर्षापूर्वी नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर माळढोक पक्षी आढळून येत होते. मागील वर्षी झालेल्या गणनेतही दोन माळढोक आढळून आले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात येथे एकही माळढोक आढळला नसल्याचे सांगण्यात आले.

नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाचा संपूर्ण अहवाल येण्यास काही महिन्यांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर कोणत्या प्रकारच्या प्राण्यांची संख्या किती आहे हे समजण्यास मदत होणार आहे.