भारतीय 'अ' संघाचा न्यूझीलंडवर डावाने विजय 

वृत्तसंस्था
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

विजयवाडा : कर्ण शर्मा आणि शाहबाज नदीम या फिरकी जोडीच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारत अ संघाने दुसऱ्या अनधिकृत कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंड अ संघाचा 1 डाव 26 धावांनी पराभव केला.

दोन सामन्यांची मालिका भारत अ संघाने 2-0 अशी जिंकली. पहिला सामना भारताने 1 डाव 31 धावांनी जिंकला होता. 

पहिल्या डावात 211 धावांची मजल मारणारा न्यूझीलंड संघ दुसऱ्या डावात 210 धावापर्यंतच पोचू शकला. दुसऱ्या डावातील 1 बाद 104 अशा भक्कम सुरवातीनंतर त्यांचा डाव कर्ण, शाहबाजच्या फिरकीसमोर कोलमडला. भारताने पहिल्या डावात 447 धावा केल्या होत्या. 

न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात कर्णने 20.3 षटकांत 78 धावांत 5, तर डावखुरा फिरकी गोलंदाज नदीमने 26 षटकांत 41 धावांत 4 गडी बाद केले. न्यूझीलंड संघ अखेरच्या दिवशी 1 बाद 104 धावसंख्येत केवळ 106 धावांचीच भर घालू शकला. एक विकेट शार्दुल ठाकूरने मिळविली. 

पहिल्या सामन्यातही 8 गडी बाद करणाऱ्या कर्णने या सामन्यातही तशीच कामगिरी केली. न्यूझीलंड कर्णधार हेन्‍री निकोल्स हा एकटा लढला. त्याने 94 धावा केल्या. त्याला समोरच्या बाजूने एकाही सहकाऱ्याची साथ मिळू शकली नाही. दुसऱ्या विकेटसाठी निकोल्स आणि जीत रावल यांच्यात झालेली 105 धावांची भागीदारी वगळता एकही भागीदारी तीसपेक्षा अधिक धावांची झाली नाही. 

संक्षिप्त धावफलक :
न्यूझीलंड अ : 211 आणि 210 (हेन्‍री निकोल्स 94, कर्ण शर्मा 5-78, शाहबाज नदीम 4-41) पराभूत वि. भारत अ पहिला डाव 447.