हलाल चित्रपटाला पोलीस संरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

राजन खान यांच्या कथेवर बेतलेल्या हलाल चित्रपटाच्या कथानकावर काही मुस्लीम संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या चित्रपटामुळे समाजाच्या भावना दुखावत असून सेन्साॅरने या चित्रपटावर बंदी घालायला हवी अशी मागणी व लेखी पत्र या संघटनांनी दिले आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रपटाचे निर्माते अमोल कागणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. त्यावेळी या चित्रपटाला पोलीस संरक्षण देण्याची ग्वाही यांनी दिली. 

मुंबई : राजन खान यांच्या कथेवर बेतलेल्या हलाल चित्रपटाच्या कथानकावर काही मुस्लीम संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या चित्रपटामुळे समाजाच्या भावना दुखावत असून सेन्साॅरने या चित्रपटावर बंदी घालायला हवी अशी मागणी व लेखी पत्र या संघटनांनी दिले आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रपटाचे निर्माते अमोल कागणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. त्यावेळी या चित्रपटाला पोलीस संरक्षण देण्याची ग्वाही यांनी दिली. 

दीपक केसरकर म्हणतात..

याची माहीती देताना चित्रपटाचे निर्माते अमोल कागणे म्हणाले, वेगवेगळ्या संघटनांकडून दबाव येत असल्याने आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. त्यांनी आमची बाजू एेकून घेतली.  त्यांनी या चित्रपटाला पोलीस संरक्षण द्यायचे कबूल केलं आहे. त्यानंतर आम्ही केसरकर यांनाही भेटलो. त्यांनीही मुंबईसह महाराष्ट्रात आवश्यक तेथे संरक्षण देण्याचे कबूल केले आहे. आम्ही शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनाही भेटलो. या सर्वच राजकीय पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा चित्रपट उद्या म्हणजे शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या कथेबाबत वाद सुरू आहेत. राजन खान यांच्या अक्षर मानव संस्थेच्या कार्यालयातही मुस्लीम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घुसून राडा घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याची मागणीही होत होती. या संरक्षणामुळे या चित्रपट निर्मात्यांना आधार मिळाला आहे. हलाल हा मुस्लीम समाजाच्या तलाकवर भाष्य करतो.