मतदानासाठी पैसे वाटले; चार महिला उमेदवारांवर गुन्हा

मच्छिंद्र मोरे
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

वडवणी (जि. बीड): जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, मतदारांना विविध प्रकारे अमिषे दाखवली जात आहेत. तालुक्यातील उपळी येथे चक्क महिला उमेदवारांनी पैसे वाटपाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी चार महिलांवर वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून यातील तिघी उमेदवार आहेत.

याबाबत माहिती अशी: तालुक्यातील उपळी ग्रामपंचायत निवडणुक चुरशीची आहे. दोन गटांमध्ये लढत होत आहे. दरम्यान, एका गटाच्या उमेदवार महिलांनी मंगळवारी (ता. 3) प्रचार फेरी काढून मतदारांना पैसे वाटप करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावरुन दुसऱ्या गटाने निवडणुक विभागाकडे तक्रार केली. यानंतर आचारसंहिता कक्षाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन खातरजमा करुन चार महिलांवर वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. यामध्ये सुनिता संतोष शेळके, सुभद्रा सावंत, रंजना राजाभाऊ शेळके व सीमा भागवत सावंत यांचा समावेश असून यातील तिघी उमेदवार आहेत. तर एकजण उमेदवाराची पत्नी आहे.