भारनियमनाविरोधात 'राष्ट्रवादी'तर्फे सटाण्यात कार्यकारी अभियंत्यांना घेराव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

सटाणा : सटाणा शहर व तालुक्यात विजेचे भारनियमन वाढले असून सर्वसामान्य जनता, शेतकरी व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या निषेधार्थ आज बागलाण तालुका व सटाणा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे येथील मालेगाव रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर बैलगाडीवर बसून मोर्चा काढला.

सटाणा : सटाणा शहर व तालुक्यात विजेचे भारनियमन वाढले असून सर्वसामान्य जनता, शेतकरी व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या निषेधार्थ आज बागलाण तालुका व सटाणा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे येथील मालेगाव रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर बैलगाडीवर बसून मोर्चा काढला.

जिल्हाध्यक्ष एड.रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी व माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल उईके यांना घेराव घालून भारनियमन रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान, अधीक्षक अभियंता कुंठेकर व मुख्य अभियंता राठोड यांनी दिवाळीपूर्वी भारनियमन बंद करून तालुक्यातील विजेच्या संदर्भातील सर्व समस्या मार्गी करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

आज दुपारी साडे बारा वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी चार फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून बैलगाडीवरून मालेगाव रोडवरील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. कार्यालयात प्रवेश करताच कार्यकर्त्यांनी 'उर्जामंत्री बावनकुळे हाय हाय' च्या घोषणा देत 'भारनियमन रद्द झालेच' पाहिजे अशी घोषणाबाजीही केली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता अनिल उईके यांना घेराव घालून भारनियमन रद्द करावे अशी मागणी केली.

श्री.उईके यांनी त्वरित मुख्य अधीक्षक अभियंता कुंठेकर यांना दूरध्वनीवरून आंदोलनाची माहिती दिली. एड.पगार व माजी आमदार संजय चव्हाण यांनी श्री.राठोड यांना भारनियमनामुळे तालुक्यातील भीषण परिस्थितीची माहिती दिली. तालुक्यातील भारनियमन रद्द करून विजेच्या समस्या तत्काळ न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी यावेळी दिला. यावेळी श्री.राठोड यांनी दिवाळीपूर्वी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 
आंदोलनात मविप्रचे माजी उपसभापती नानाजी दळवी, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, जिभाऊ सोनवणे, महिला तालुकाध्यक्षा एड.रेखा शिंदे, खेमराज कोर, अमोल बच्छाव, किरण पाटील, नगरसेविका सुरेखा बच्छाव, वंदना भामरे, उषा भामरे, शमा दंडगव्हाळ, संदीप साळवे, संजय पवार, झिप्रू सोनवणे, फइम शेख, पंडित अहिरे, विलास सोनवणे, वसंत भामरे, जे.डी.पवार, केशव मांडवडे, सनीर देवरे, दीपक रौदळ, केवळ देवरे, हितेंद्र बागुल, डॉ.विठ्ठल येवलकर, मोठाभाऊ अहिरे, राकेश देवरे, सुरेश सोनवणे, जनार्दन सोनवणे, अशोक देवरे, पंडित इंगळे, ज्ञानेश नंदन, महेंद्र सोनवणे, रत्नाकर सोनवणे, तुषार मोरे, केशव सोनवणे, अरुण अहिरे, ज.ल.पाटील, दगाजी सोनवणे, किशोर ह्याळीज आदींसह शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: marathi news marathi websites Nashik News MSEDCL Load Shedding NCP