बाजीराव रस्त्यावर धडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

पुणे - बाजीराव रस्त्यावर नो पार्किंगमध्ये बेशिस्तपणे लावलेली वाहने आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी बुधवारपासून धडक कारवाई सुरू केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे सतत बेशिस्तपणे वागणाऱ्या वाहनचालकांमध्ये गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बाजीराव रस्त्यावर दोन्ही बाजूला नो पार्किंगमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहने लावण्यात येतात. पी१-पी-२ च्या नियमांचे उल्लंघन करण्यात येते. तसेच, लालमहालाकडून बाजीराव रस्त्यावर डाव्या बाजूने विरुद्ध दिशेने वाहने येतात. या बेशिस्त वाहनचालकांमुळे बाजीराव रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होते. यासंदर्भात ‘सकाळ’ने वाहतुकीचा प्रश्‍न मांडला होता. त्यावर विश्रामबाग वाहतूक विभागाच्या पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त अशोक मोराळे यांच्या सूचनेनुसार विश्रामबाग वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक सूरज पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई सुरू केली.

बाजीराव रस्त्यावर दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ वाहनांच्या पार्किंगसाठी पी-१, पी-२ चा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच, या भागात वाहनचालकांसाठी सूचना फलक लावण्यात येणार आहेत. बाजीराव रस्त्यावर विश्रामबाग वाहतूक विभागाकडून ही कारवाई नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. 
- सूरज पाटील, सहायक निरीक्षक, वाहतूक विभाग, विश्रामबाग

Web Title: pune news crime on bajirao road