बेवारस वाहने ताब्यात घेणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

पुणे - गेले अनेक महिने रस्त्यावर पडून असलेली बेवारस वाहने ताब्यात घेण्याची कारवाई महापालिका प्रशासन करणार आहे. तसेच वाहनमालकांना दंडही करण्यात येणार आहे. वाहनांची वर्दळ असलेल्या प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. पुढील महिनाभर ही कारवाई सुरू राहणार आहे.

शहर आणि उपनगरांमधील अनेक रस्त्यांवर बेवारस वाहने पडून आहेत. त्या त्या परिसरातील रहिवाशांना सूचना करूनही बेवारस वाहने उचलली गेली नाहीत. वर्दळीच्या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करण्यात आली आहेत. 

यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली असून, त्यात रस्त्यालगतच वाहनमालकांनी अतिक्रमणे केल्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय, रस्त्यालगतच्या हातगाड्या आणि स्टॉल काढण्याची मागणीही पोलिसांनी केली आहे.

या पार्श्‍वभूमीवर अतिक्रमणे काढून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरभर कारवाई सुरू केली आहे. यात बेवारस वाहने उचलून ताब्यात घेण्यात येणार आहेत, असे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी गुरुवारी सांगितले.

शहरात सर्वत्र बेकायदा हातगाड्या आणि अन्य प्रकारच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई नियमित करण्याची सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना केली आहे. रस्त्यांवरील बेवारस वाहने संबंधित मालक उचलून नेत नसेल तर ती ताब्यात घेण्यात येईल. तसेच संबंधित वाहनाच्या मालकांना दंड आकारण्यात येणार आहे.
- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विरोधी विभाग