सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३२५ पैकी २१ ग्रामपंचायती बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील ३२५ पैकी रात्री उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २१ ग्रामपंचायती बिनविरोध निवड झाल्या आहेत. यात कणकवलीत ९, वैभववाडी १, सावंतवाडी ६, मालवण २, दोडामार्ग ३ इतक्‍या ग्रामपंचायतीचा समावेश आहे; तर कुडाळ, वेंगुर्ले व देवगड तालुक्‍याची उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती.

 उमेदवारी अर्ज मागे घेऊन चिन्हाचे वाटप झाल्याने आज (ता. ६) प्रचाराला सुरुवात होणार असून बहुतांशी ठिकाणी सरपंचांच्या थेट दुरंगी आणि तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती असल्याने मोठी चुरस आहे. 

कणकवली तालुक्‍यातील ५८ ग्रामपंचायतीपैकी ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून ५ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बिनविरोध तर दोन ग्रामपंचायतीमध्ये सदस्य बिनविरोध आहेत. थेट सरपंच निवडीमुळे १२७ सरपंच आणि ७०६ सदस्य आपले नशीब आजमावणार आहेत. वैभववाडी तालुक्‍यात १७ पैकी निमअरूळे ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून अरूळे, सडुरे, शिराळे आणि हेत या चार ठिकाणी सदस्य निवडी बिनविरोध असून १६ ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार आहे.

सावंतवाडी तालुक्‍यात ५२ पैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. वेर्ले, कलंबिस्त, नेतर्डे, गेळे, कवठणी, तळवणे यांचा समावेश आहे; तर ४६ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. दोडामार्ग तालुक्‍यात २८ पैकी ३ ग्रामपंचायत बिनविरोध झाली. केर भेकुर्ली, मार्ले, झरेबांबर आंबेली यांचा समावेश आहे; तर २५ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.

वेंगुर्ले तालुक्‍यात ग्रामपंचायत बिनविरोध न झाल्याने २१ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. मालवण तालुक्‍यात ५५ पैकी २ ग्रामपंचायत बिनविरोध झाली. घुमडे आणि पोईप यांचा समावेश आहे. यात ५३ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. तर कुडाळ, वेंगुर्ले व देवगड तालुक्‍यातील उशिरापर्यत प्रक्रिया सुरू होती.