पारोळ्यात घर कोसळल्याने चौघांचा दबून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

काझी परिवाराचे जीर्ण झालेले मातीच्या घराचे छत कोसळल्याने ही घटना घडली आहे.

जळगाव : पारोळा शहरातील काझी वाडा परिसरात मातीचे घर कोसळून त्यात दबले गेल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (शुक्रवार) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

पारोळा शहरात काझी वाड्यात राहणारे चादर व्यावसायिक करणारे काझी परिवारातील चार जणांचा मृत्यू झाला. तर एक जण सुदैवाने वाचला आहे. काझी परिवाराचे जीर्ण झालेले मातीच्या घराचे छत कोसळल्याने ही घटना घडली आहे.

घरात झोपलेले असताना छत कोसळल्याने चारही जण दबले गेले. यात हाशिम काझी, सायराबी काझी, मोइनोद्दीन काझी आणि शबिनाबी काझी या चार जणांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानतर परिसरातील नागरिकांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. मात्र त्यात त्यांना यश मिळू शकले नाही.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :