भविष्य

मेष:
मनोबल उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. काहींची बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
वृषभ:
सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुमचा विशेष प्रभाव राहील. व्यवसायामध्ये महत्त्वाचे व्यवहार यशस्वी होणार आहेत.
मिथुन:
जिद्दीने कार्यरत राहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
कर्क:
मानसिक त्रास संभवतो. नोकरीच्या ठिकाणी त्रास होण्याची शक्‍यता आहे. मनोबल कमी राहणार आहे.
सिंह:
तुमच्या व्यक्‍मित्त्वाचा प्रभाव वाढेल. मनोबल उत्तम राहील. आत्मविश्‍वासाच्या जोरावर अनेक कामे यशस्वी कराल.
कन्या:
खर्च वाढणार आहेत. वाहने चालविताना, तसेच प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
तूळ:
महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल. काहींची वैचारिक प्रगती होईल.
वृश्चिक:
मनोबल उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
धनु:
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मकर:
प्रवास सुखकर होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. व्यवसायातील आर्थिक कामे मार्गी लावू शकाल.
कुंभ:
महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे.
मीन:
प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. प्रवास टाळावेत. वाहने चालविताना दक्षता हवी. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहे.
रविवार, फेब्रुवारी 18, 2018 ते शनिवार, फेब्रुवारी 24, 2018
मेष:
कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह एक भरगच्च पॅकेज देणारा. मोठ्या उलाढाली. व्यावसायिक प्राप्ती. तरुणांना नोकरीच्या संधी. गुरुवार भाग्योदयाचा. विशिष्ट करारमदार होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रसंगतीतून विचित्र त्रास.
वृषभ:
दशमस्थानातले रवी-बुध-शुक्र यांचा एक जाहीरनामा अस्तित्वात येईल! तरुणांसाठी हा सप्ताह प्रचंड उत्साहाचा. सप्ताहाची सुरवात मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी यशाच्या वाटेकडं नेणारी. सप्ताहाचा शेवट मोठ्या सुवार्तांचा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती पुत्रोत्कर्षाच्या साक्षीदार होतील. धनवर्षाव. गुंतवणुकींतून लाभ.
मिथुन:
ग्रहांचा पट पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सर्वतोपरी साथ देणारा. मोठे चमत्कार घडतील. तरुणांचं परदेशगमन. ता. 21 व 22 हे दिवस सूर्योदयी सुवार्तांचे. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींच्या जीवनात सप्ताहाचा शेवट स्त्री-पुरुष संबंधातून नाट्य घडवणारा. नका तोडू सिग्नल! खोटं बोलू नका.
कर्क:
अष्टमस्थ ग्रहांची एक खेळी राहील. जुगार टाळा. नका अडकू प्रलोभनात. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना घरातल्या तरुणांविषयीच्या सुवार्ता कळतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना वाहनभय. मंगळवार घातक. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह गणिताच्या स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम. एखादी बाजी माराल. सप्ताहाचा शेवट आनंदोत्सवाचा.
सिंह:
ग्रहांचा पट चोरट्या धावा काढून देणारा! अर्थातच सप्ताहात निसर्गाची जबरदस्त साथ राहील. प्रेमिकांनो, चोरटे नेत्रकटाक्ष हेरा! ता. 21 व 22 हे दिवस रेशीमधागे बांधणारे. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना चंद्राच्या अमृतकला खेचून घेतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींची गुरुभेट होईल. ध्यानात दिव्यानुभूती येईल.
कन्या:
व्यावसायिक पॅकेज देणारा सप्ताह. कर्ज मिळेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. 22 व 23 हे दिवस अतिशय भन्नाट ! मोठे आर्थिक व्यवहार होतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह पायाच्या दुखापतींचा. पैशाचं पाकीट जपावं. मंगळवारची संध्याकाळ उपसर्गाची. राजकीय क्षेत्रातल्या मंडळींनी दक्षतेनं राहावं.
तूळ:
फोटोफिनिश यश मिळवणारी रास! नशीब तुमच्या बाजूनं आहे; मात्र नका गाजवू स्त्रीवर आधिपत्य. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. 22 व 23 हे दिवस बोनस शेअर्स देणारे. शत्रू मित्र बनतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह छंद-उपक्रमांद्वारे एकूणच उल्लेखनीय यशाचा. मात्र, नका अडकू प्रेमाच्या जाळ्यात.
वृश्चिक:
नेपच्यूनशी होणारे योग एखादं संशयपिशाच्च मागं लावू शकतात. ता 20 व 21 हे दिवस मानसिक पातळीवरून प्रतिकूलच. नवपरिणितांना त्रास. बाकी, अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह वैयक्तिक उत्सव-समारंभांचा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवारची संध्याकाळ कलहजन्य. संयम बाळगा.
धनु:
मोठा ऊर्जासंपन्न सप्ताह. बॅटरी चार्ज होईल! धडक योजना काढाच. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांचं मोठं साह्य मिळेल. कला, छंद वा विशिष्ट उपक्रमांद्वारे झळकाल. गिनीज बुकात नोंद होईल! उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्हिसा मिळेल.
मकर:
ग्रहांचा पट मोठ्या लाभांसाठी फील्डिंग लावेल! श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना चंद्रकलांतून व्हिटॅमिन्स मिळतील. विशिष्ट व्याधींचा उपशम होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना एखादं व्यावसायिक सूत्र गवसेल. मित्रांच्या सल्ल्यातूनच विशिष्ट लाभ होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना एखादी स्त्री मोहात पाडेल.
कुंभ:
राशीतल्या ग्रहांचं क्‍लिकिंग मोठं मजेशीर राहील. अफलातून कल्पना सुचतील. तरुणांना अतिशय अनुकूल ग्रहमान. छंद-उपक्रमांना दाद मिळेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना व्हिसा मंजूर होईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींच्या ग्रहांचा पट स्वैर फलंदाजीस अनुकूल. एखादी स्त्री जीवनात येईल.
मीन:
हा सप्ताह मानसिक पातळीवर प्रतिकूलच. एखाद्या अपमानाचा दंश वेदना देत राहील. असमंजस व्यक्तींशी संवाद टाळा. राजकारणाच्या वाटेला जाऊ नका. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार घातक. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सहली-करमणुकीचे योग. काव्य सुचेल!

ताज्या बातम्या