कायदा केवळ सामान्य लोकांसाठीच आहे का ?

सनी शिंदे
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- पार्किंगच्या निर्धारित रेषे बाहेर वाहन उभे करून समोरील दुकानात गेलेली व्यक्ती परत येई पर्यंत जागेवरील वाहन गायब झालेले असते. ते चोरीला गेलेले नसते तर ते कर्तव्यदक्ष पोलिसांनी तत्परतेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केलेली ती कारवाई असते. 

दि. 8/11/2017 रोजी सकाळी 12 वा. पुणे कॅम्प येथे वेस्टर्न टाॅकीज जवळ मुख्य रस्त्यावर दुचाकी पार्किंग समोर पोलिसांनी स्वतः ची दुचाकी (MH 12 GJ 5181) पार्किग बाहेर डबल पार्क केली होती. कायदा केवळ सामान्यांकरीताच आहे का ? व त्याचे पालन ही त्यांनी करायचे का ? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना नेहमी पडतो.

टॅग्स