जागतिक गहू उत्पादन ७५२ दशलक्ष टन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली - जागतिक पातळीवर यंदा अनुकूल हवामान आणि पेरणी क्षेत्रात वाढीमुळे गहू उत्पादन ७५२.८ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज अन्न व कृषी संस्थेने (एफएओ) मंगळवारी (ता. ८) व्यक्त केला. आक्टोबर महिन्यात ७५०.१ दशलक्ष टनांचा अंदाज होता. तुलनेत सुधारित अंदाजात उत्पादनात वाढणार असल्याचे नमूद केले आहे.

‘एफएओ‘च्या माहितीनुसार रशियामध्ये गव्हासाठी अनुकूल परिस्थिती असून, उत्पादनात मोठी वाढ शक्य आहे. गत अंदाजात आणि सध्याच्या सुधारित अंदाजातही ही बाब मनूद करण्यात आली आहे. मात्र, अमेरिका आणि आॅस्ट्रेलियाच्या उत्पादनात काहीशी घट होण्याचेही म्हटले आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) जगातील गहू उत्पादन १.७ दशलक्ष टनांनी वाढून ते ७४४.९ दशलक्ष टनांवर पोचेल, असा अंदाज नुकताच व्यक्त केला होता. तर अांतरराष्ट्रीय धान्य परिषदेने (आयजीसी) ७४८ दशलक्ष टन गहू उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली होती.

दरम्यान, जगात सध्या गव्हाचा २५८ दशलक्ष टन साठा शिल्लक 
अाहे. याआधी हा साठा २६१.२ दशलक्ष टन असल्याचे अंदाजात सांगितले होते. एफएओच्या सुधारित अहवालानुसार शिल्लक साठ्यात काहीशी घट आहे.