भविष्य

मेष:
मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला चांगला दिवस आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
वृषभ:
प्रवास शक्‍यतो टाळावेत. नातेवाइकांशी मतभेदाची शक्‍यता आहे. शासकीय कामात यश लाभेल. महत्त्वाची शासकीय कामे उरकून घ्यावीत. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.
मिथुन:
उत्साह व उमेद वाढेल. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. गुंतवणुकीला दिवस चांगला आहे.
कर्क:
मानसिक ताणतणाव जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. दगदग वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामात यश मिळेल. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल.
सिंह:
मुलामुलींच्या दृष्टीने एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मुलांकरिता जादा खर्च करावा लागेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहाणार आहे.
कन्या:
कामाचा ताण व दगदग जाणवेल. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका. आर्थिक क्षेत्रात समाधानकारक वातावरण राहील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
तूळ:
व्यवसायात थोड्या फार अडचणी जाणवतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. प्रॉपर्टीच्या संदर्भात अनुकूलता आहे.
वृश्चिक:
व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
धनु:
तुमचे निर्णय योग्य ठरतील. आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
मकर:
कामामध्ये अडचणी येणार आहेत. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. संततिसौख्य लाभेल.
कुंभ:
व्यवसायात आर्थिक लाभ होतील. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. मित्रांची मदत मिळेल. प्रवास सुखकर होतील. गडी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीचे प्रश्‍न मार्गी लागतील.
मीन:
सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. शत्रूपीडा नाही. विरोधकांवर मात कराल. वैवाहिक सौख्य लाभेल.
रविवार, नोव्हेंबर 19, 2017 ते शनिवार, नोव्हेंबर 25, 2017
मेष:
विदेशात नोकरीचा योग या सप्ताहात तुम्ही जीवनातल्या काही फायनल्स जिंकणार आहात. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती सतत फ्लॅश न्यूजमध्ये राहतील. शुक्रवार भाग्य घेऊन येणारा. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरी. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी मंगळवारी काळजी घ्यावी. भाजण्या-कापण्याची शक्‍यता. गृहिणींनी सावध राहावं. बाकी, सप्ताहात मोठा धनलाभ. नवस फेडाल.
वृषभ:
नोकरीच्या ठिकाणी काळजी घ्या सप्ताहातलं ग्रहमान भावनाप्रधान. स्त्रीवर्गाला त्रासदायक! प्रिय व्यक्तींच्या चिंता अकारण ग्रासतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरवात नोकरीतल्या हितशत्रुपीडेची. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २३ व २४ हे दिवस मुलाखतींसाठी, विशिष्ट कोर्टविषयक कामांसदर्भात अतिशय शुभदायक. स्पर्धात्मक यश मिळेल.
मिथुन:
आई-वडिलांचा भाग्योदय पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह नोकरी-व्यवसायात मोठं यश देणारा. थोरा-मोठ्यांच्या सहकार्यातून कामं होतील. ता. २२ व २३ हे दिवस अत्यंत प्रवाही. सतत ऑनलाईन राहा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार विवाहविषयक गाठी-भेटींतून फलदायक. आई-वडिलांचा भाग्योदय.
कर्क:
सरकारी कामं फत्ते होतील हा सप्ताह जीवनातली वन-डे जिंकून देणारा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती देवदीपावलीच्या या सप्ताहात आपले नवस फेडतील. नूतन वास्तुयोग आहेत. ता. २३ व २४ हे दिवस अनेकानेक सुवार्तांचे. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टाच्या कामात यश. सरकारी कामं फत्ते होतील.
सिंह:
नोकरीत बढतीचा योग सप्ताहात संसर्गजन्य साथींपासून जपा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरवात विचित्र संसर्गाची. नका खाऊ बाहेरचं. बाकी, पूर्वा नक्षत्राची मेट्रो वेगात धावतच राहील. गुरुवार महत्त्वाच्या कामांतून जबरदस्त क्‍लिक होणारा. नोकरीत बढतीच्या यादीत प्रवेश होईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टाच्या कामात यश.
कन्या:
व्यावसायिक आडाख्यांना यश देवदीपावलीच्या या सप्ताहात पूर्वसुकृत फलदायी होईल. व्यावसायिक आडाखे यशस्वी होतील. ता. २३ व २४ हे दिवस शुभग्रहांच्या ऊर्जास्रोतांचे. शिवाराधना करून घराबाहेर पडा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींच्या ओंजळीत प्रसादफुलं पडतील. वैवाहिक जीवनात गोड बातमी कळेल.
तूळ:
जीवन सार्थकी लागेल तुमच्या जीवनरथाचं सारथ्य सध्या शुभग्रहच करत आहेत. मग काही बोलायलाच नको! देवदीपावलीचा सप्ताह स्वाती नक्षत्राचं हृदयशल्य दूर करणारा. जीवन सार्थकी लागल्याचा अनुभव येईल. ता. २३ व २४ हे दिवस अतिशय मांगल्यपूर्ण राहतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना कुबेर प्रसन्न!
वृश्चिक:
दिव्य अनुभवांची प्रचीती सप्ताहाची सुरवात ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सभोवतालच्या मानवी कृत्यांच्या प्रदूषणातून अस्वस्थ करणारी. सूर्यदर्शन घेत चला. बाकी, सप्ताहातली गुरू-शुक्राची आंतर्वाहिनी सरस्वती शुक्रवारी प्रकट होईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना दिव्य लाभ घडतील, दिव्य अनुभव येतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींची कर्जफेड होईल. विवाहयोग.
धनु:
चित्तशुद्धीची हीच ती वेळ! तुमच्या गुरूच्या राशीला यंदाची देवदीपावली विशेष महत्त्वाची. हीच ती वेळ चित्त शुद्ध करण्याची! चित्त शुद्ध झाल्यावर शनी हा शंकर होत असतो. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना याचीच प्रचीती या सप्ताहात येणार आहे. ता. २३ व २४ हे दिवस अतिशय शुभदायक.
मकर:
नोकरीत सुवार्ता मिळतील सप्ताहाची सुरवात जुगारसदृश व्यवहारातून घातक ठरू शकते. कुसंगती टाळा. बाकी, श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना देवदीपावलीचा हा सप्ताह ऊर्जा देणारा. ता. २३ व २४ हे दिवस नोकरीत सुवार्तांचे. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात व्यवसायात रेकॉर्डब्रेक प्राप्ती होईल.
कुंभ:
असमंजस व्यक्तींशी वाद नको पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अष्टमस्थ मंगळाचा व्हायरस सतावेल. शारीरिक कसरती टाळा. असमंजस व्यक्तींशी वाद घालू नका! बाकी, शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना गुरू-शुक्राची आंतर्वाहिनी सरस्वती देवदीपावलीत प्रसन्न होऊन सभा-संमेलनात साथ देईल. आत्मसन्मान होईल. ज्योतिर्लिंगाचं दर्शन होईल.
मीन:
नोकरीत मान-सन्मानाचा योग शत्रुत्वाच्या किंवा वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर सप्ताह काहीसा प्रतिकूल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरवात विचित्र घटनांद्वारे छायाग्रस्त करण्याची शक्‍यता. बाकी, रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना देवदीपावलीचा हा सप्ताह शुभदायक. ता. २३ व २४ या दिवसांत देवतांचा अनुग्रह होईल. नोकरीत सन्मान.

ताज्या बातम्या