म्हाडाची पुढील वर्षी हजार घरांची सोडत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

मुंबई - म्हाडाच्या शुक्रवारच्या सोडतीत अपयशी ठरलेल्या अर्जदारांसाठी चांगली बातमी असून, पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात सुमारे एक हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. 

मुंबई - म्हाडाच्या शुक्रवारच्या सोडतीत अपयशी ठरलेल्या अर्जदारांसाठी चांगली बातमी असून, पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात सुमारे एक हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. 

गोरेगाव, सायन प्रतीक्षानगर आणि इतर ठिकाणच्या घरांचा समावेश पुढच्या सोडतीत होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पहाडी (गोरेगाव) येथे पाच हजार घरे बांधण्यासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत. ही घरे दोन वर्षांत बांधण्यात येतील. दर वर्षी एप्रिल-मे महिन्याच्या अखेरीस घरांची सोडत काढण्यात येते; परंतु यंदा महारेरा, वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे सोडत लांबणीवर पडली. यंदाच्या 819 घरांच्या सोडतीत 803 अर्जदार यशस्वी ठरले आहेत. या घरांसाठी 65 हजार 126 जणांनी अर्ज केले होते.