ठाण्यात ‘पद्मावती’चा निषेध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

ठाणे - दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटामुळे सुरू झालेले वादंग थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. राजस्थानमध्ये राजपूत घराण्यांनी या चित्रपटास विरोध केल्यानंतर ठाण्यातही विविध राजपूत संघटनांनी एकत्र येऊन या चित्रपटास जोरदार विरोध केला. पद्मावती चित्रपटाच्या निषेधार्थ राजपूत संघटनांनी शुक्रवारी सकाळी ठाणे जिल्हा कार्यालयासमोर मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला. 

राजपूत राणी पद्मावती ही वीर योद्धा होती. खिलजीच्या हाती लागण्यापेक्षा आपली अब्रू वाचवण्यासाठी राणी पद्मावतीने १६ हजार महिलांसह अग्निसमर्पण (जोहार) केले. असे कर्तृत्व असताना या महान राणीचे आणि अल्लाउद्दीन खिलजीचे प्रेमसंबंध दाखवणे म्हणजे राणीच्या शौर्याचा आणि त्यागाचा अपमान असल्याचे रुद्र प्रतिष्ठानचे सल्लागार धनंजय सिंग यांनी सांगितले. वारंवार इशारा देऊनही संजय भन्साळी हे सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास समाजासमोर दाखवत असल्याचा आरोप या संघटनांनी या वेळी केला. 

या मोर्चात राजस्थान राजपूत परिषद (मुंबई), रूद्र प्रतिष्ठान, श्री राजपूत क्षत्रिय गौरव ट्रस्ट, करनी सेना, मारवाडीज इन, राष्ट्रीय करनी सेना, राम सेना, श्री जैन श्वेताम्बर तेरापंथी सभा, हम हिंदुस्थानी, जागृत भारत, हिंदू एकता, अग्रवाल समाज, राजस्थान प्रगती मंडल, ठाणे सिटी ज्वेलर्स असोसिएशन, जाल्लोर सिरोही विकास परिषद आदी संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.